हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक; छत्रपती संभाजीनगरातील शाळांमध्ये प्रमुखांना दिलं राज ठाकरेंचं पत्र
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १९ जून:- शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, आज छत्रपती संभाजीनगरातील विविध शाळांतील मुख्याध्यापकांशी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. या वेळी राज ठाकरेंचे पत्र वैयक्तिकरित्या प्रत्येक मुख्याध्यापकांना देण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात हिंदी भाषेची सक्ती स्वीकारार्ह नसल्याचं मत मांडत, मनसेच्या भूमिकेला प्रमुखांनी शंभर टक्के पाठिंबा दर्शविला. सरकारने हिंदी विषयाची सक्ती केल्यास मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, प्रशांत जोशी, प्रतीक गायकवाड, विशाल बोंगाणे, मोनू तुसे, सचिन आरख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मनसेने केंद्र सरकारला उद्देशून स्पष्ट केले की, हिंदी सक्ती करायची असेल तर ती प्रथम गुजरात, आंध्रप्रदेशसारख्या हिंदीतर राज्यांमध्ये करून दाखवावी. अन्यथा महाराष्ट्रात ती मान्य केली जाणार नाही.