हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात; अंभई ग्रामपंचायतीत कृषी दिन साजरा

महाराष्ट्र वाणी

अंभई, दि. १ जुलै :- ग्रामपंचायत कार्यालय अंभई येथे आज (दि.१ जुलै २०२६) हरितक्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या शेती क्षेत्रातील अमूल्य योगदानाची आठवण करून देत शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ कृषी दिनही साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थितांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात झालेली प्रगती, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

या कार्यक्रमाला ग्रामसेवक मुकाळे, मोबीन देशमुख, शंकर सोनवणे, कादीर देशमुख, उस्मान शेख, सोहेल देशमुख, पशुसेवक विजय मुंडे, मधू मैंद, किरण सोनवणे, इलीयास देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावपातळीवर कृषी क्षेत्राबाबत जागरूकता निर्माण करत शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम पार पडला.

"शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार करणाऱ्या नेतृत्वाची आठवण म्हणजेच कृषी दिनाचा खरा संदेश!"