विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला 'महाराष्ट्र बंद'; बाळासाहेब आंबेडकरांचे राज्यव्यापी आवाहन
समविचारी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे; वंचित बहुजन आघाडीच्या सर्व घटकांना नियोजनाचे निर्देश
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि २१ :- दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी **२३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'**चे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत, राज्यातील सर्व समविचारी राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सर्व स्तरांतील नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.
यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा समित्या, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि फुले-शाहू-आंबेडकरी विद्वत सभांना तातडीने समविचारी पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच या सर्व संघटनांनी विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांशी संपर्क साधून महाराष्ट्र बंदला व्यापक पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.