वाढदिवसानिमित्त डॉ. रिजवान खान यांचा अनोखा उपक्रम; धाडमध्ये मोफत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र वाणी
धाड, बुलढाणा दि २१ :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. रिजवान खान यांच्या वाढदिवसानिमित्त मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या वतीने धाड येथील नॅशनल पब्लिक इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये २० ऑगस्ट रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात नागरिकांसाठी रक्तदान, नेत्र तपासणी तसेच कान, नाक आणि घसा यांची मोफत तपासणी अशा विविध आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
वाढदिवसाचा खर्च उत्सवावर न करता समाजोपयोगी उपक्रमासाठी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सलीम सारंग यांनी डॉ. रिजवान खान यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. समाजसेवा आणि देशसेवेचे असे उपक्रम सातत्याने सुरू राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी डॉ. रिजवान खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी डॉ. रिजवान खान यांनी ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या विचारावर भर देत वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी गरजूंसाठी आरोग्यसेवा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव सूफी मोहम्मद शफीक खान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नरेशभाऊ शेटके, जिल्हा प्रभारी प्रा. डी. एस. लहाणे, बुलढाणा तालुकाध्यक्ष सोनुने भाऊ, प्रदेशाध्यक्ष स्वरोजगार विभाग जावेद अत्तार, धारशेरा येथील माजी सरपंच तथा जिल्हा परिषद सदस्य रिझवान सौदागर, माजी सरपंच दिगंबर जाधव नाना, सरपंच सावित्रीताई बोडे, धाड ग्रामपंचायत सदस्य टीका खान, शफीकभाई रफीक दादा, जाकीरभाई कुरेशी, शफीक किलेदार, शकील सौदागर, अझीमभाई जमदार, महाराष्ट्र उपाध्यक्षा आयेशा खान, महाराष्ट्र महासचिव शगुफ्ता घोजारिया, दिंडोशी तालुकाध्यक्ष नदीम शेख, हाजरा खान यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.