रामदास पेठमध्ये जुगार अड्ड्यावर मोठी धडक : १७ जण अटकेत, ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

रामदास पेठमध्ये जुगार अड्ड्यावर मोठी धडक : १७ जण अटकेत, ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र वाणी न्युज 

अकोला ( प्रतिनिधी) २३ जून :- अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत १७ जुगाऱ्यांना अटक केली. ही कारवाई रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मासूम शाह दर्गाजवळील एका गोदामात करण्यात आली.

पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पावसाच्या धारेतही त्यांनी डीबी पथक, आरसीपी जवानांसह छापा टाकला. यामध्ये १७ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपींकडून ५,७६० रुपये रोख, १.१५ लाखांचे १० मोबाईल आणि २.१० लाख किमतीच्या ४ दुचाकी अशा एकूण ३,३०,७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटकेत आलेले आरोपी :

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अकोल्यातील तसेच उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील आरोपींचा समावेश आहे. या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

जाफर मेहबूब बहरेवाले

सद्दाम शामक नौरंगाबादी

शेख आबिद शेख कालू नौरंगाबादी

साबीद इस्माईल बेनीवाले

जाफर हुसेन चौधरी

हुसेन इस्माईल चौधरी

जुबेर मोहम्मद लालखान (मुजफ्फरनगर)

साहिल खान, मख्खन खान, खान नूर खान (मुजफ्फरनगर)

मोसीन खान युनूस खान

साजिद इलियाज गौरव (नायगाव)

अख्तर रमजान गौरव (जाम मोहल्ला)

रफिक इब्बू चौधरी

अन्सार सलीम चौधरी (मनकरन प्लॉट)

शेख अयान शेख हमीद

अब्दुल वसीम अब्दुल जब्बार

सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

परिसरात दहशत : पूर्वीच्या वादात झाला होता खून

रामदास पेठ परिसरात यापूर्वीही जुगार अड्ड्यांवरून दोन गटांत शस्त्रसज्ज वाद झाले होते. या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपींना मुक्त केले होते. त्यामुळे अशा जुगार अड्ड्यांमुळे पुन्हा रक्तरंजित घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांची कारवाई कौतुकास्पद

पावसातही खंबीर भूमिका घेऊन जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार उद्योगांना चपराक बसली असून, अनेक जुगाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.