मौलाना आझाद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मखदूम फारुकी यांचा MARTI कृती समितीकडून सत्कार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ४ :- MARTI कृती समिती, महाराष्ट्रच्या वतीने मौलाना आझाद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मखदूम फारुकी यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी MARTI कृती समिती, महाराष्ट्रचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. समितीच्या सदस्यांनी डॉ. फारुकी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या भेटीदरम्यान शिक्षण क्षेत्राचा विकास, समाजातील विविध घटकांच्या प्रगतीसाठी आवश्यक उपक्रम तसेच अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासंदर्भातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील युवकांना सक्षम करणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
एकजूट, शिक्षण, विकास आणि अधिकार या उद्दिष्टांसाठी MARTI कृती समिती, महाराष्ट्र सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.