मधुकर अहेलाजी जाधव यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

मधुकर अहेलाजी जाधव यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २० :- अखिल भारतीय माळी महासंघाच्या उद्योजक आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्षपदी अंभई, ता. सिल्लोड येथील मधुकर अहेलाजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष उद्योजक आघाडी श्रीहरी पांडुरंग मगर, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष कारभारी जाधव, जाफराबाद तालुकाध्यक्ष डॉ. रमेश सांडुजी मोठे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष कार्तिक बेहेरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अप्पासाहेब सुखदेव गोरे, जालना जिल्हाध्यक्ष गणेश आसाराम हरकळ, जालना जिल्हा उपाध्यक्ष बबनराव घायाळ तसेच अंबड तालुकाध्यक्ष संतोष भानुदास राऊत यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली.

मधुकर अहेलाजी जाधव यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या माध्यमातून उद्योजक समाजबांधवांना संघटित करण्यासह त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जाधव यांच्या निवडीबद्दल अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेशभाऊ हिरळकार, विश्वस्त रमेश माळी, प्रभाकरजी सातव, भिमरावजी कोथिंबीरे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अभय तायडे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष विजय राजाभाऊ खरात, छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बाबुराव काळवणे, जालना शहराध्यक्ष गजानन खांडेभराड, प्रदेश संघटक डॉ. गजाननजी अजगर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधुकरजी घिरके, राजेश द. मेहेत्रे, बुलडाणा जिल्हा सरचिटणीस प्रा. दीपक नन्हई, छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्ष रमेश एकनाथ झोरे, तालुका उपाध्यक्ष भिलाभाऊ तोताराम अहिरे, जालना जिल्हा संघटक नंदकिशोर अशोक जाधव, पैठण तालुकाध्यक्ष विष्णु आत्माराम बनकर, पैठण तालुका उपाध्यक्ष सुनील बनकर आणि देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष काशिनाथ ऊर्फ प्रकाशजी खांडेभराड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

नवीन जबाबदारीबद्दल जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.