पदवीधरांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत ठाम आवाज देणार : डॉ. प्रतापसिंह पाटील

पदवीधरांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत ठाम आवाज देणार : डॉ. प्रतापसिंह पाटील
पदवीधरांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत ठाम आवाज देणार : डॉ. प्रतापसिंह पाटील

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ७ :- शहरातील आकाश जाधव सर यांच्या ‘संकल्प एज्युकेशन’ येथे महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पदवीधर युवकांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, रोजगार, शासकीय भरती प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली.

पदवीधर युवकांनी आपल्या अभ्यासातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सुविधा, अभ्यासिकांची गरज तसेच भरती प्रक्रियेतील विविध प्रश्न डॉ. पाटील यांच्यासमोर मांडले. यावेळी युवकांनी त्यांच्या अपेक्षा आणि भविष्यासंदर्भातील चिंताही व्यक्त केल्या.

‘पदवीधरांच्या समस्या केवळ ऐकून घेण्यापुरती आपली भूमिका नसून, त्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून योग्य व्यासपीठावर ठामपणे मांडणे आवश्यक आहे,’ असे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सांगितले.

मराठवाड्यातील पदवीधरांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या प्रश्नांना सक्षम व्यासपीठ मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पदवीधरांच्या हक्कांसाठी विधानपरिषदेत प्रभावीपणे आवाज उठवून त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॉ. पाटील यांनी यावेळी दिले.

या संवादावेळी आशिष पवार, अतुल गावंडे, प्रशांत जगताप, प्रणव टेरे सर, अरविंद ठोंबरे सर, अतिश शिंदे सर, अमोल पाटील सर, शरद जाधव सर यांच्यासह मोठ्या संख्येने पदवीधर बांधव उपस्थित होते.

अखलाख देशमुख | महाराष्ट्र वाणी न्यूज