कोंढव्यातून वारीसाठी सेवाभाव!हाजी गफूर पठाण यांच्याकडून वारकऱ्यांना भेटवस्तू वाटप!
महाराष्ट्र वाणी न्युज
कोंढवा, पुणे (दि. २१ जून) – संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या कोंढवा भागातील वारकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मा. नगरसेवक हाजी गफुर पठाण यांच्या वतीने सेवाभावातून भेटवस्तू वाटप करण्यात आले.
कोंढवा गावातील विठ्ठल मंदिरात आयोजित या कार्यक्रमात वारकऱ्यांना छत्र्या, पाण्याच्या बाटल्या आणि खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून "राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश" दिला गेला, जो उपस्थित ग्रामस्थांना भावून गेला.
या वेळी मा. नगरसेविका नंदा लोणकर, संजय लोणकर, पंढरीनाथ लोणकर, मुरलीधर लोणकर, सुदाम वांजळे, आप्पा रोकडे, बाप्पु रोकडे, नाना पारगे, दत्तात्रय लोणकर, विजय गुरुजी, दगडु गोते, प्रशांत लोणकर, गणेश लोणकर, भरत लिंभोरे, दत्ता ढुरे, शंकुतला लोणकर, सुमन लोणकर, जावेद शेख, इम्तियाज शेख, बाप्पु मुलाणी, सज्जन कवडे, राजु आडागळे, हबीब सिद्दीकी यांची विशेष उपस्थिती होती.
एकतेचा संदेश देणारा, धार्मिक आणि सामाजिक सलोखा वाढवणारा हा उपक्रम संपूर्ण परिसरात कौतुकास्पद ठरला आहे.