"उत्तुंग निकाल, सखोल मार्गदर्शन… युनिक अकॅडमीने घडवले यशाचे शिल्पकार!"

"उत्तुंग निकाल, सखोल मार्गदर्शन… युनिक अकॅडमीने घडवले यशाचे शिल्पकार!"
"उत्तुंग निकाल, सखोल मार्गदर्शन… युनिक अकॅडमीने घडवले यशाचे शिल्पकार!"

महाराष्ट्र वाणी न्युज 

बुलढाणा दि१९ जुलै :- MHT-CET 2025 च्या निकालात युनिक अकॅडमी, बुलढाणा येथील विद्यार्थ्यांनी यंदाही आपली घोडदौड कायम राखत 90 पर्सेंटाइल पेक्षा अधिक गुण मिळवून गौरवशाली परंपरेत भर घातली आहे. यानिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात केवळ यशाचे कौतुक न करता, युनिक अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन देखील करण्यात आले. MHT-CET नंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी अशा विविध क्षेत्रांत योग्य कॉलेजची निवड कशी करावी, शासकीय व खासगी कॉलेजमधील फरक, प्रवेश प्रक्रियेतील बारकावे, शिष्यवृत्ती योजना, आणि करिअर संधींचा वेध या बाबींचे चार तासांचे अभ्यासपूर्ण सत्र घेण्यात आले.

या वर्षी एकूण 27 विद्यार्थ्यांनी 80 पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळवले असून, त्यात अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून असूनही त्यांच्या मेहनतीच्या जोरावर शहरी विद्यार्थ्यांशी बरोबरी साधली आहे.

युनिक अकॅडमीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांचा केवळ प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत नाही तर पुढील 4-5 वर्षे देखील करिअर मार्गदर्शन व मेंटॉरिंगसाठी सातत्याने साथ दिली जाते. बारावीनंतर चुकीची निवड आयुष्यभराचा पश्चाताप ठरू शकते, हे लक्षात घेता, विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी ते सर्वतोपरी मार्गदर्शन देतात.

“शिक्षण क्षेत्रातील विश्वसनीय नाव” म्हणून युनिक अकॅडमीने बुलढाण्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संपर्क:

📞 Yunik Academy, Buldhana

📱 9730822232

यश ही योगायोगाची बाब नसून योग्य मार्गदर्शनाची फलश्रुती आहे – आणि युनिक अकॅडमी हेच त्याचे जिवंत उदाहरण आहे!