इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण
महाराष्ट्र वाणी
जळगाव दि ९ :- पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासोबतच आईप्रती आदराची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य रियाज शाह सर, सुपरवायझर जाकीर सर, मसूद सर, फरहान सर, तंजिम मिस, सादिया मिस, फिरासत मिस तसेच एच.जे. थीम कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर डॉ. चाँद खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षारोपण केले. तसेच लावलेल्या रोपांची नियमित देखभाल करण्याचा संकल्प केला. अधिकाधिक झाडे लावून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ या संदेशातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती जबाबदारीची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.