"७ दिवसांत अट मागे घ्या अन्यथा आंदोलन – राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेला इशारा"

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), 5 जून :—
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या औरंगाबाद शहर शाखेने महापालिकेकडून जन्म प्रमाणपत्रासाठी लावण्यात आलेल्या मालमत्ता कराच्या अटीला जोरदार आक्षेप घेतला आहे. पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अहमद जलीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन देऊन या अन्यायकारक अटीचा तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली.
महानगरपालिका सध्या नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देताना मालमत्ता कर भरल्याचा पुरावा मागत आहे. मात्र, हे धोरण कायदेशीर आणि मानवी हक्कांच्या दृष्टीने तितकेच आक्षेपार्ह असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
"भाड्याच्या घरांमध्ये, झोपडपट्टीत राहणाऱ्या अनेक नागरिकांकडे मालमत्ता कर भरल्याचा पुरावा असणे शक्य नाही. शासनाने यांना करातून सूट दिलेली असताना, त्याचाच आधार घेऊन जन्म प्रमाणपत्र नाकारणे हे सरळसरळ मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे," असे जलीस यांनी स्पष्ट केले.
या निवेदनावर अहमद जलीस यांच्यासह सिद्दीकी सलीमोद्दीन, मो. अशफाक, सय्यद नासेर, मो. अजहर, आणि शेख फैजानउद्दीन यांचीही सही असून, सात दिवसांच्या आत ही अट मागे घेण्यात आली नाही तर कायदेशीर आणि लोकशाही मार्गांनी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पत्ता: दार उल अव्वाम, ब्लॉक नंबर १, नाज़ टॉवर जवळ, रंगार गल्ली रोड, तारूदगर नाला, औरंगाबाद - 431001
संपर्क:
9370775778