शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क माफ; सरकारचा ऐतिहासिक निर्णय

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क माफ; सरकारचा ऐतिहासिक निर्णय
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क माफ; सरकारचा ऐतिहासिक निर्णय

महाराष्ट्र वाणी

मुंबई वा. दि २१महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत सहधारकांमध्ये किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आता कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही.

तसेच, वडिलोपार्जित शेतजमिनीवर वारसाहक्क प्राप्त झालेल्या सहधारकांनी कलम ८५ अंतर्गत प्रक्रिया न करता थेट नोंदणीस सादर केलेल्या वाटणीपत्रांनाही नोंदणी शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे शेतजमिनींच्या वाटणी प्रक्रियेला गती मिळणार असून, ती अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल. विशेष म्हणजे, नागरिकांवरील आर्थिक भार कमी होऊन हजारो शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे.

👉 आता जमीन वाटणीची प्रक्रिया सोपी, जलद आणि खर्चमुक्त — शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर!