विश्वशांतीसाठी प्रार्थना, वक्फ कायदा रद्द करण्याची मागणी; ईद उल अझहा निमित्त अजिंठा चौक इदगाह मैदानावर सामूहिक नमाज संपन्न

विश्वशांतीसाठी प्रार्थना, वक्फ कायदा रद्द करण्याची मागणी; ईद उल अझहा निमित्त अजिंठा चौक इदगाह मैदानावर सामूहिक नमाज संपन्न
विश्वशांतीसाठी प्रार्थना, वक्फ कायदा रद्द करण्याची मागणी; ईद उल अझहा निमित्त अजिंठा चौक इदगाह मैदानावर सामूहिक नमाज संपन्न

महाराष्ट्र वाणी न्युज 

जळगाव ( प्रतिनिधी) दि७ जून :- ईद उल अझहा (बकर ईद) च्या निमित्ताने अजिंठा चौक येथील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली. या प्रसंगी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. नमाजीनंतर मौलाना उस्मान कासमी व मौलाना कलीम पटेल यांनी विशेष प्रार्थना करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

“हे अल्लाह, आम्हा समस्त मानव जातीला विश्वबंधुत्व, त्याग, आणि तुझ्या आज्ञेचे पालन करण्याची सद्बुद्धी देवो...” अशी दुआ मौलाना उस्मान यांनी करताच संपूर्ण मैदानात "आमीन" चा आवाज घुमला. या प्रसंगी शांतता, सौहार्द आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याचा संदेश देण्यात आला.

वक्फ कायदा रद्द करा व फलीस्तीनसाठी विशेष दुआ — मौलाना कलीम पटेल यांचे आवाहन

उर्दू भाषेत प्रवचन करताना मौलाना कलीम पटेल यांनी ईद उल अझहा चे महत्त्व विषद केले. “प्रेषित इब्राहिम आणि इस्माईल यांची अल्लाहने घेतलेली परीक्षा आणि त्याग याचे स्मरण आजच्या दिवशी होते. आपणही त्याग आणि समर्पणाचे जीवन जगावे,” असे ते म्हणाले.

मौलाना पटेल यांनी पुढे सांगितले की, “सरकार वक्फ कायद्याच्या नावाखाली आमच्याकडून मस्जिद, मदरसे, आणि कब्रस्तान हिरावून घेत आहे. यासाठी केवळ प्रार्थना नव्हे तर शांततामय प्रयत्नही गरजेचे आहेत.” त्याचबरोबर, फलीस्तीनमधील स्थितीवर चिंता व्यक्त करत त्यांनी मस्जिद ए अक्सा आणि युद्धग्रस्त लोकांसाठी विशेष दुआ करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

नमाज, अरबी प्रवचन व सामूहिक शुभेच्छा

ईद गाह मैदानावर सकाळी ७.१५ वाजता नमाजचे पठण सुरु झाले. मौलाना उस्मान कासमी यांनी अरबी भाषेत प्रवचन दिले आणि सामूहिक दुआने नमाजचा समारोप केला. ८.३० वाजता कार्यक्रम संपला. नमाजीनंतर एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

विशेष क्षण 

1. ईद गाह ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक यांना शुभेच्छा देताना माजी जनरल सेक्रेटरी फारुक शेख, माजी सचिव अनिस शाह व ट्रस्टचे उपाध्यक्ष नजीर मुलतानी आदी उपस्थित.

2. भाऊसाहेब पाटील, ईदच्या शुभेच्छा देताना फारुक शेख यांच्यासोबत.

3. फुटबॉल प्रशिक्षक अरबाज, राहील, वसीम, तौसिफ व आमीर शेख, फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांना शुभेच्छा देताना.

ईदच्या निमित्ताने मुस्लिम समाजातील एकोपा, विश्वबंधुत्व आणि न्यायासाठीचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झाला. वक्फ कायद्याबाबत जनजागृतीसह, फलीस्तीनच्या न्यायासाठी प्रार्थना करत, ‘युद्ध नको, विश्वशांती हवी’ हा संदेश देण्यात आला.