"मराठवाडा भूषण" पुरस्काराने पत्रकारांचा गौरव — पालकमंत्री शिरसाट यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी सोहळा

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १६ जून :–

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित २५ व्या वर्धापन दिन अधिवेशन आणि “मराठवाडा भूषण” पुरस्कार सोहळा संत एकनाथ रंगमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला.

या भव्य सोहळ्याला उपस्थित राहून जिल्हयाचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. त्यांनी पत्रकारितेच्या कार्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणत त्याच्या सन्मानाचे कौतुक केले.

या कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या नामवंत पत्रकारांना “मराठवाडा भूषण” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळ्यामुळे पत्रकारांच्या कार्याची दखल घेतली गेली असून, समाजात पत्रकारितेच्या भूमिकेला नवे बळ मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.