प्रतापनगर परिसरात वाढणार पोलिस गस्त! अनोळखींच्या ‘ओल्या पार्ट्यां’वर शेवटची घंटा 🚔

प्रतापनगर परिसरात वाढणार पोलिस गस्त! अनोळखींच्या ‘ओल्या पार्ट्यां’वर शेवटची घंटा 🚔
प्रतापनगर परिसरात वाढणार पोलिस गस्त! अनोळखींच्या ‘ओल्या पार्ट्यां’वर शेवटची घंटा 🚔

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ९ :- प्रभाग क्र. १९ मधील कासलीवाल रेसिडेन्सीसमोरील मोकळ्या मैदानावर बाहेरील अनोळखी व्यक्ती येऊन संध्याकाळच्या वेळी ओल्या पार्ट्या, नशेखोरी अशा प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर उस्मानपुरा पोलिस स्टेशनचे निरीक्षक संग्राम ताटे यांनी परिसराची पाहणी केली.

नगरसेविका शिल्पाराणी वाडकर व सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी पोलिस गस्त वाढवावी आणि पेट्रोलिंगचा कालावधी वाढवावा अशी मागणी केली. या वेळी सागर वाडकर, रवि रानमारे, आदित्य दहिवाल यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक श्री. ताटे यांनी नागरिकांना आश्वासन दिले की—

👉 परिसरात पोलिस गस्त वाढवली जाईल

👉 नियमित पेट्रोलिंग सुरू ठेवले जाईल

🔹 स्थानिकांच्या तक्रारींनंतर अखेर पोलिस प्रशासनाने घेतला पुढाकार!