डॉ. ताहिर शेख यांना श्रद्धांजली; इकरा एज्युकेशन सोसायटीत शोकसभा

डॉ. ताहिर शेख यांना श्रद्धांजली; इकरा एज्युकेशन सोसायटीत शोकसभा
डॉ. ताहिर शेख यांना श्रद्धांजली; इकरा एज्युकेशन सोसायटीत शोकसभा

महाराष्ट्र वाणी 

जळगाव दि १२ :- इकरा एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ असलेले डॉ. ताहिर शेख यांचे दि. ११ मार्च २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या स्मरणार्थ इकरा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

या शोकसभेला सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य, विविध संस्थांचे प्रमुख तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी डॉ. ताहिर शेख यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि समाजहिताच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ते अत्यंत प्रामाणिक, मृदुभाषी आणि समर्पित व्यक्तिमत्त्व होते. इकरा एज्युकेशन सोसायटीच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विशेषतः विद्यार्थ्यांच्या शिक्षण व संस्कारासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. ताहिर शेख यांनी कठीण परिस्थितीतही धैर्य आणि चिकाटीने शैक्षणिक कार्य पुढे नेले. समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. तसेच मण्यार समाजाच्या शैक्षणिक जागृतीसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

या शोकसभेत एजाज मलिक, प्रा. झफर शेख, अब्दुल रशीद शेख, मजीद सेठ झकरिया, अब्दुल अजीज सालार, गुलाम नबी दादा बागवान आणि तारिक अन्वर यांच्यासह विविध संस्थांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

शेवटी डॉ. अख्तर शाह यांच्या प्रार्थनेने शोकसभेची सांगता करण्यात आली.

शिक्षणासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या डॉ. ताहिर शेख यांच्या कार्याची आठवण समाजाला सदैव प्रेरणा देत राहील.