जात-पात नको, विकासासाठी एकजूट दाखवा – मंत्री उदय सामंत यांचे भराडीतील जाहीर आवाहन

जात-पात नको, विकासासाठी एकजूट दाखवा – मंत्री उदय सामंत यांचे भराडीतील जाहीर आवाहन
जात-पात नको, विकासासाठी एकजूट दाखवा – मंत्री उदय सामंत यांचे भराडीतील जाहीर आवाहन

महाराष्ट्र वाणी 

सिल्लोड(प्रतीनीधी) दि. ५ :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भराडी (ता. सिल्लोड) येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी शिवसेनेचे नेते व आमदार अर्जुनराव खोतकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सभेमध्ये मंत्री सामंत यांनी मतदारांना संबोधित करताना जातीपातीच्या राजकारणावर स्पष्ट भूमिका मांडली.

जात-पात महाराष्ट्राची संस्कृती नाही

मंत्री उदय सामंत म्हणाले की,

“जात-पात करून राजकारण करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. काही लोक जातीपातीचे राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांना मतदारांनी त्यांची जागा दाखवावी.”

विकासासाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा

तसेच त्यांनी मतदारांना आवाहन करत सांगितले की,

“आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर विकासासाठी एकजूट दाखवा आणि शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. शिवसेना उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा.”

सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

या प्रचार सभेसाठी स्थानिक पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, कार्यकर्ते तसेच मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेतील जोश आणि गर्दी पाहता परिसरात शिवसेनेच्या प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.

सभेच्या माध्यमातून शिवसेनेने विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत मतदारांमध्ये सकारात्मक संदेश दिला.

राजकारण नाही, विकासाची लढाई आहे – मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागतोय हे लवकरच स्पष्ट होईल!