घाटनांद्रा येथे रेकॉर्डब्रेक प्रचार सभा! मतदारांच्या विश्वासाने भारावले आमदार अब्दुल सत्तार

घाटनांद्रा येथे रेकॉर्डब्रेक प्रचार सभा! मतदारांच्या विश्वासाने भारावले आमदार अब्दुल सत्तार
घाटनांद्रा येथे रेकॉर्डब्रेक प्रचार सभा! मतदारांच्या विश्वासाने भारावले आमदार अब्दुल सत्तार

महाराष्ट्र वाणी 

घाटनांद्रा (ता. सिल्लोड) दि ४ :- घाटनांद्रा येथे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आशाबाई अर्जुन गाढे, पंचायत समिती गणाच्या उमेदवार सोफिया बी. इब्राहिम शेख, तसेच आमठाणा गणाचे उमेदवार रघुनाथ पुंडलिक मोरे यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली.

सभेत उपस्थित असलेल्या जनसमुदायाच्या मोठ्या सहभागामुळे सभा रेकॉर्डब्रेक ठरली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी भावना व्यक्त करत सांगितले की,

“घाटनांद्रा येथे झालेल्या या ऐतिहासिक सभेने मी मनापासून भारावून गेलो आहे. ही उपस्थिती म्हणजे मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. हा विश्वास आमच्यासाठी नवी ऊर्जा आहे.”

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाचा प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सभेच्या प्रारंभी आमदार सत्तार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. घाटनांद्रा गटाच्या सर्वांगीण विकासासाठी धनुष्यबाण निशाणीवर मतदान करून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता घाटनांद्रा गटात निवडणुकीचा रंग चढू लागला आहे!