ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा नारायणपूर बु. येथे संपन्न

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा नारायणपूर बु. येथे संपन्न
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा नारायणपूर बु. येथे संपन्न

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १६ जून :– ग्रामपंचायत नारायणपूर बु. येथे गावच्या विकासासाठी निःस्वार्थ योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी, उपसरपंच व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सरपंच मा. हाजी नासेर पटेल यांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना हाताची घडी हे प्रतीकात्मक बक्षीस देण्यात आले. त्याचबरोबर शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानाने कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना नवा उत्साह मिळाला आहे.

गावातील नागरिकांचाही या सोहळ्यास मोठा प्रतिसाद मिळाला. कर्मचारी व ग्रामस्थांमधील सुसंवाद, सहकार्य आणि विकासाचा विचार लक्षात घेता हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

गौरवाचे हे क्षण कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाला मिळालेली सार्वजनिक दाद ठरली.