अजिंठा घाट ठप्प होण्यावर तोडगा कधी? इद्रिस मुलतानींचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ :- सतत बंद पडणाऱ्या अजिंठा घाट संदर्भात अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या गंभीर समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करत प्रतिनिधीमंडळाने संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड यांची भेट घेत निवेदन सादर केले.
घाट परिसरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून घाटामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे नियंत्रण दोन्ही संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. त्यामुळे घाट बंद होताच त्वरित माहिती मिळून पोलीस घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या निवेदनावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष इद्रिस मुलतानी, सोयगाव पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण, सदस्य राहुल राठोड, योगेश शिंदे, कृष्णा सिरसाठ, संजय चव्हाण, योगेश महाकाळ, अशोक भिडे तसेच भाजपा सरचिटणीस शुभम अन्वीकर आदी उपस्थित होते.
👉 घाट बंदीचा प्रश्न मार्गी लागणार का? नागरिकांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे!