इकरा एच. जे. थीम कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
महाराष्ट्र वाणी
जळगाव(प्रतिनिधी) दि ८ :- येथील इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित इकरा एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरुण तसेच इकरा मोहाडी कॅम्पस येथे क्रीडा विभागाच्या वतीने वार्षिक क्रीडा महोत्सव (Annual Sports Meet) मोठ्या उत्साहात आणि जोशात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, सचिव एजाझ मलिक, माजिद सेठ जकरिया, इरफान सालार, युनानी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य कारी कुद्दूस साहेब, इकरा पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक शकील सर, मोहाडी कॅम्पसचे कार्यालय प्रभारी अफझल भाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख, प्रा. डॉ. युसूफ पटेल, मौलाना मुजम्मिलोद्दीन नदवी, प्रा. डॉ. अमीन काझी, प्रा. डॉ. साजिद मलिक, प्रा. डॉ. तनवीर खान, प्रा. उमर खान पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ
क्रीडा महोत्सवातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, सचिव एजाझ मलिक, माजिद सेठ जकरिया तसेच क्रीडा संचालक प्रा. डॉ. चांद खान यांच्या हस्ते क्रिकेट खेळून करण्यात आले.
या स्पर्धेत एफ.वाय., एस.वाय., टी.वाय., बी.ए. व बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
एस.वाय. बी.एस्सी. ‘डॉमिनेटर’ संघ विजेता
अंतिम सामन्यात एस.वाय. बी.एस्सी. ‘डॉमिनेटर’ संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. संघाला प्रा. डॉ. अमीन काझी व आमिर काझी यांचे मार्गदर्शन लाभले.
तर टी.वाय. बी.एस्सी. संघ उपविजेता ठरला. या संघाला प्रा. डॉ. साजिद मलिक व डॉ. इरफान शेख यांचे मार्गदर्शन मिळाले.
महिला विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धा
महाविद्यालयाच्या मैदानावर महिला विद्यार्थिनींसाठी लेमन-स्पून रेस, म्युझिकल चेअर यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. फिरदौस शेख, प्रा. डॉ. अंजली कुलकर्णी, प्रा. डॉ. आयशा बासित, प्रा. डॉ. शबाना खाटीक यांच्यासह महिला प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.
यशस्वी आयोजनाचे कौतुक
क्रीडा संचालक प्रा. डॉ. चांद खान यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा महोत्सव यशस्वीरित्या पार पडला. आयोजनासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
✨ अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड आणि संघभावना अधिक दृढ होत आहे!