सोयगावच्या ‘विकासासाठी इद्रिस मुलतानी थेट केंद्रीय मंत्र्याच्या भेटीला

सोयगावच्या ‘विकासासाठी इद्रिस मुलतानी थेट केंद्रीय मंत्र्याच्या भेटीला
सोयगावच्या ‘विकासासाठी इद्रिस मुलतानी थेट केंद्रीय मंत्र्याच्या भेटीला

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १ :- सोयगाव तालुक्यातील फर्दापूर जिल्हा परिषद गटात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत माहीन इद्रिस मुलतानी यांनी दमदार विजय मिळवत मतदारांचा प्रचंड विश्वास संपादन केला आहे. या विजयामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, तळागाळातील नेतृत्वाला जनतेने पुन्हा एकदा पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

या यशाबद्दल भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी फर्दापूर गटातील सर्व गावकरी, कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानले. त्यांनी हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि विकासाच्या राजकारणाचा असल्याचे सांगितले.

सोयगाव तालुक्यात जनतेच्या समस्या समजून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करणारे नेतृत्व म्हणून इद्रिस मुलतानी यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. निवडणुकीनंतरही त्यांनी विकासकामांना गती देण्यासाठी थेट केंद्रस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, मोबाईल नेटवर्क, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार आणि पर्यटन विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेतली आहे.

अलीकडेच त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन देऊळगाव गुजरी ते सावळदबारा या महत्त्वाच्या मार्गाच्या सिमेंटीकरणासाठी चर्चा केली. या रस्त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क सुधारून शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या बैठकीत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि स्वराज डापके उपस्थित होते.

त्यानंतर केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू यांच्यासोबतही त्यांनी सिल्लोड-सोयगाव भागातील विकासासाठी निधीबाबत चर्चा केली. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी निधी, अल्पसंख्यांक युवकांसाठी रोजगारनिर्मिती आणि महिला बचत गटांना सहाय्य या मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दुर्गम भागातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचीही त्यांनी भेट घेतली. मोलखेडा, महालब्दा, टिटवी, चारूतांडा, मूर्ती, रवळा, ढाबा तसेच अजिंठा परिसरात मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी करण्यात आली असून, यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

सोयगाव तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने दिल्लीपर्यंत पाठपुरावा करणारे नेतृत्व लाभल्याने नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. गावोगावी भेटी देत, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आणि प्रत्यक्ष समस्यांवर काम करणारे इद्रिस मुलतानी यांच्याबद्दल जनतेत विश्वास अधिक दृढ होत आहे.

फर्दापूर गटातील हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, तो विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल मानले जात आहे. आगामी काळात रस्ते, पाणी, शिक्षण, नेटवर्क, महिला सक्षमीकरण आणि रोजगाराच्या संधींमध्ये मोठी प्रगती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“जनतेचा विश्वास जपून विकासाचा वेग वाढवण्याचा निर्धार – सोयगावच्या भविष्यासाठी नवी आशा!”