सावधान…! गल्लीगल्ली ५०० रुपयांत तुटलेले मोबाईल खरेदी करणाऱ्यांपासून धोका? नागरिकांनी राहावे सतर्क 📱

सावधान…! गल्लीगल्ली ५०० रुपयांत तुटलेले मोबाईल खरेदी करणाऱ्यांपासून धोका? नागरिकांनी राहावे सतर्क 📱

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १० :- सध्या अनेक भागात काही लोक गल्लीबोळात फिरत “तुटलेले-फुटलेले मोबाईल द्या… ५०० रुपये मिळतील…” अशी हाक देत मोबाईल खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांना हा व्यवहार फायदेशीर वाटत असला तरी यामुळे नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते खान एजाज अहेमद यांनी दिला आहे.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोनमध्ये मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक माहिती साठवलेली असते. मोबाईलमध्ये फोटो, व्हिडिओ, संपर्क क्रमांक, बँकिंग अ‍ॅप्स, WhatsApp, Gmail यांसारखी महत्त्वाची माहिती असते. मोबाईल Reset न करता विकल्यास ही माहिती चुकीच्या व्यक्तींच्या हाती जाण्याचा धोका असल्याचे खान एजाज अहेमद यांनी सांगितले.

तसेच काही लोक जुने मोबाईल दुरुस्त करून किंवा त्यातील पार्ट्स काढून हजारो रुपयांना विकतात. काही प्रकरणांमध्ये मोबाईलचा IMEI नंबरही गैरप्रकारांसाठी वापरला जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोबाईल विकण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

✔️ मोबाईलचा Factory Reset करा

✔️ Google / Gmail / WhatsApp खाते Log Out करा

✔️ SIM कार्ड आणि Memory Card काढून घ्या

✔️ शक्य असल्यास IMEI नंबर लिहून ठेवा

नागरिकांनी थोड्याशा पैशांसाठी घाईत मोबाईल विकण्याऐवजी योग्य खबरदारी घ्यावी आणि इतरांनाही याबाबत जागरूक करावे, असे आवाहन खान एजाज अहेमद यांनी केले आहे.

👉 सावध राहा… आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.