अंभई ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

अंभई ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
अंभई ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

✍️ महाराष्ट्र वाणी

अंभई, दि. १४ एप्रिल २०२६ :- अंभई येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी परिसरात उत्सवी वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत अधिकारी श्री. बी. एस. मुकाडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनीही पुष्प अर्पण करून महामानवाला विनम्र अभिवादन केले.

यावेळी विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संविधान निर्मितीतील योगदानाची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

समाजातील सर्व घटकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची आठवण यावेळी करण्यात आली. तसेच त्यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

👉 "ज्ञान, समता आणि न्यायाचा संदेश देणाऱ्या महामानवाच्या विचारांचा वारसा जपूया, हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल!"