AIMIM कडून महापालिकेसाठी स्वीकृत नगरसेवकांची घोषणा; तीन सदस्यांना संधी

AIMIM कडून  महापालिकेसाठी स्वीकृत नगरसेवकांची घोषणा; तीन सदस्यांना संधी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २९ :- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाकडून  महानगरपालिकेसाठी सन २०२६–२७ या कार्यकाळाकरिता स्वीकृत नगरसेवक (Co-opted Member) यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष Asaduddin Owaisi यांनी ही घोषणा केली असून, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष Imtiaz Jaleel यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

 नियुक्त स्वीकृत नगरसेवक :

मोहम्मद असरार

शेख अहमद

कुणाल गौतम खरात

नवनियुक्त सदस्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करावे तसेच सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांमध्ये पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, सर्व नवनियुक्त नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 आता या नव्या टीमकडून शहराच्या विकासाला किती गती मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.