मान्यवरांची उपस्थितीत उद्या मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे ‘तोहफतुल हदीस’ पुस्तकाचे भव्य प्रकाशन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.१३ :- मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे मंगळवारी (दि. १४) क़ारी अब्दुल्ला खान मार्कोनी यांच्या तिसऱ्या पुस्तक “तोहफतुल हदीस” चा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता होणार आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन शेख-उल-हदीस हज़रत मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. मखदूम फारुक़ी भूषवणार आहेत.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मौलाना डॉ. सदरुलहसन नदवी मदनी, मौलाना डॉ. अब्दुल रशीद नदवी मदनी, आर्किटेक्ट अरशद अहमद, मेजर सैय्यदा फरासत आणि डॉ. शाझिया नहरी उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. अनवरुल्ला कादरी, सय्यद शाहिद हमीद, डॉ. इक़बाल मिन्ने आणि डॉ. अझहर सिद्दीक़ी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
क़ारी अब्दुल्ला खान मार्कोनी हे “इल्मुल कुरआन व हदीस अकॅडमी” चे प्रमुख असून, ते औरंगाबादसह विविध शहरांमध्ये कुरआनचे भाषांतर शिकवतात. त्यांनी कुरआनसोबत हदीसचे शिक्षण देण्यालाही सुरुवात केली असून, परलोकात यश मिळवण्यासाठी या दोन्हींचे ज्ञान आवश्यक असल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे.
“तोहफतुल हदीस” या पुस्तकाच्या माध्यमातून समाजात मानवता, सहानुभूती, शांतता, योग्य व्यवहार, इबादत, शेजाऱ्यांचे हक्क तसेच हलाल-हराम यांची योग्य ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजातील मत्सर आणि गैरसमज दूर करून बंधुभाव वाढवणे हेही या पुस्तकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
👉 ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे हे पुस्तक समाजात नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.