मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी एम. के. देशमुख यांची नियुक्ती; भाजपला संघटनात्मक बळ

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी एम. के. देशमुख यांची नियुक्ती; भाजपला संघटनात्मक बळ
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी एम. के. देशमुख यांची नियुक्ती; भाजपला संघटनात्मक बळ

✍️ महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १५ :- आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात मराठवाड्यातील राजकीय घडामोडींना वेग देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी सहप्रमुख म्हणून एम. के. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार संजय केनेकर तसेच शहराध्यक्ष किशोर शितोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

एम. के. देशमुख यांनी मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, त्यांचा व्यापक जनसंपर्क आणि प्रभावी संघटन कौशल्य यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेला निश्चितच वेग मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी वाढवणे हे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून देशमुख यांच्या नियुक्तीमुळे भारतीय जनता पार्टीला संघटनात्मक बळ मिळणार असल्याची खात्री व्यक्त केली जात आहे.

👉 आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती भाजपसाठी गेमचेंजर ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!