१६ जूनपासून 'एसटी पास थेट शाळेत'; आता विद्यार्थ्यांना एसटी पाससाठी आगारात जाण्याची गरज नाही

१६ जूनपासून 'एसटी पास थेट शाळेत'; आता विद्यार्थ्यांना एसटी पाससाठी आगारात जाण्याची गरज नाही

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि १५ जून :- विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी!

राज्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक आनंददायक आणि दिलासा देणारी योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम १६ जूनपासून सुरू करणार आहे.

या योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना एसटी आगारात जाऊन पास काढण्याची गरज नाही. आता हे एसटी पास थेट त्यांच्या शाळा वा महाविद्यालयात वितरित केले जाणार आहेत. यासाठी एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी संबंधित शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांशी पत्रव्यवहार करून विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याची सूचना दिली आहे.

ही अभिनव योजना संपूर्ण राज्यात राबविली जाणार असून याचा लाभ लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व मेहनत वाचणार असून त्यांना सोयीने प्रवास करता येणार आहे.