हर्सूल येथे अनधिकृत प्लॉटिंग, पाईप निष्कासित

हर्सूल येथे अनधिकृत प्लॉटिंग, पाईप निष्कासित
हर्सूल येथे अनधिकृत प्लॉटिंग, पाईप निष्कासित

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १२ जून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशान्वये आणि अतिक्रमण विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत दिनांक ११ जून रोजी गजानन नगर गट क्रमांक २९९ हर्सूल येथील अनधिकृत प्लॉटिंग निष्कासित करण्यात आली आणि नाल्याच्या प्रवाह थांबून टाकण्यात आलेले पाईप तोडण्यात आले.

या ठिकाणी नाल्यामध्ये सिमेंटचे पाईप टाकून रस्ता तयार करण्याचे व त्यापुढे भराव टाकून प्लॉटिंग करण्यात आली होती. 

सदर काम थांबवून नाल्यांमधील पाईप पोकलेनद्वारे बाहेर काढण्यात आले तदनंतर सर्वच्या सर्व १२ मोठ्या आकाराचे सिमेंट पाईप जागेवर तोडण्यात आले आहेत व नाल्याचा मूळ प्रवाह पूर्ववत करण्यात आला. संबंधित अतिक्रमण धारक यांना १०,०००/- रुपये दंड करण्यात आला.

सदर कारवाईस सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक चार अशोक गिरी, इमारत निरीक्षक अश्विनी कोथलकर,रवींद्र देसाई आणि नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव इत्यादी उपस्थित होते.

 संबंधित अतिक्रमण धारकास दहा हजार रुपये दंड लावण्यात आला.