सोशल मीडियात व्यस्त तरुणांना रिजिजूंचा मिश्कील टोला; ‘इश्क करायचा असेल तर उर्दू शिका’

सोशल मीडियात व्यस्त तरुणांना रिजिजूंचा मिश्कील टोला; ‘इश्क करायचा असेल तर उर्दू शिका’

नवी दिल्ली दि १९ :- उर्दू भाषेची गोडी, तिचे साहित्यिक सौंदर्य आणि प्रेमाशी जोडले जाणारे नाते यावर केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मिश्कील अंदाजात भाष्य केले. भारत एक्सप्रेस उर्दूच्या ‘बझ्म-ए-सहाफत’ कार्यक्रमात ते बोलत होते.

आजची तरुण पिढी सोशल मीडिया आणि विशेषतः Instagram मध्ये अधिक रमलेली असल्याचे सांगत रिजिजू यांनी आपल्या शैलीत तरुणांशी संवाद साधला. सध्याच्या काळात तरुण कोणाचे फारसे ऐकून घेत नाहीत, असे म्हणत त्यांनी सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाकडेही लक्ष वेधले.

याच संदर्भात रिजिजू यांनी उर्दू भाषेचा उल्लेख करत उपस्थितांमध्ये हशा पिकवणारा सल्ला दिला. “इश्क करायचा असेल तर उर्दू शिका, तुमची मोहब्बत पक्की होईल,” असे ते म्हणाले.

उर्दू भाषेतील शब्दांची गोडी आणि प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याची तिची खास शैली यांचा संदर्भ देत रिजिजू यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या मिश्कील टिप्पणीची कार्यक्रमात विशेष चर्चा झाली.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित