सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी जावेद कुरेशी यांच्या पुढाकाराने महापौर-आयुक्तांची विशेष भेट; विकासकामांना सहकार्याचे आश्वासन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १९ :- शहरातील डॉ. सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी आज महापालिका प्रशासनाकडून सरोवराची पाहणी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक जनाब जावेद कुरेशी यांच्या पुढाकाराने महापौर समीर राजूरकर आणि महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिनांक १८ सप्टेंबर रोजी सलीम अली सरोवराला भेट देत प्रस्तावित विकासकामांची माहिती घेतली.
यावेळी सरोवराच्या परिसराचा विकास, सुशोभीकरण आणि नागरिकांसाठी परिसर अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. महापौर समीर राजूरकर आणि आयुक्त अमोल येडगे यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सलीम अली सरोवराचा परिसर शहरातील एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी सांगण्यात आले.
या पाहणीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अफसर खान, स्थायी समिती सदस्य अमित भुईगळ तसेच झोन क्रमांक १ च्या सभापती करुणा मेघनाद जाधव यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांसाठी एक चांगले सार्वजनिक ठिकाण उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.