शेख युसूफ यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारीपदी नियुक्ती; अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीने सत्कार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्णयाचे स्वागत; पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेख युसूफ यांचा गौरव

शेख युसूफ यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारीपदी नियुक्ती; अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीने सत्कार
शेख युसूफ यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारीपदी नियुक्ती; अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीने सत्कार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २८ :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने शेख युसूफ यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल अल्पसंख्याक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेख युसूफ यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

शेख युसूफ यांच्यावर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने काँग्रेस पक्षातील त्यांच्या कार्याची दखल घेतल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पक्षसंघटना अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्रित आणणे आणि पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविणे, यासाठी ही जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.

या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सत्कारप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शेख युसूफ यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला अधिक बळ मिळेल आणि पक्षाच्या विस्तारासाठी सकारात्मक कार्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी अनिस पटेल, मोईन इनामदार, इंजिनिअर इफ्तेखार शेख, सय्यद नदीम सौदागर, साजिद कुरेशी आणि हनीफ भाई यांच्यासह अल्पसंख्याक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेख युसूफ यांच्या नियुक्तीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी राजकीय व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित