शिवसेनेचा वर्धापन दिन समाजसेवेच्या रूपात: वृद्धांना फळ-वाटप व स्नेहाचा हात
महाराष्ट्र वाणी न्युज
चंद्रपूर २० जून :- शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील देवाडा येथील डेबू सावली वृद्ध आश्रमात अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वृद्ध आजी-आजोबांच्या हस्ते केक कापण्यात आला आणि त्यांना अल्पोहार व फळांचे वाटप करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमातून आनंद व आपुलकीचा क्षण वृद्धांसोबत वाटण्यात आला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी केले. कार्यक्रमात महिला आघाडी जिल्हा प्रमुख मिनलताई आत्राम, बल्लारपूर महिला आघाडी प्रमुख क्रिष्णाताई सुरमवार, तालुका संघटक संजय शिंदे, उप-महानगर प्रमुख सूचक दखने व विश्वासजी खैरे, उप-तालुका प्रमुख विक्की महाजन, माजी नगरसेवक नानाभाऊ दुर्गे, निखिल सुरमवार व विवेक दुर्गे यांची उपस्थिती होती.
या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली. वृद्धांना आपुलकीने आधार देत समाजात सकारात्मकतेचा संदेश देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हा उपक्रम हा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारा ठरला.