महेश सूर्यवंशी यांचा लायन्स क्लब ऑफ पुणेतर्फे सत्कार; सामाजिक उपक्रमांसाठी सहकार्याची चर्चा
पुणे दि २६ :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रेसन डायनेस्टीक सेंटर आणि अनूर्वी फाउंडेशन यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला लायन्सचे माजी प्रांतपाल राजेश अग्रवाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवी अग्रवाल यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. या कार्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडूनही सहकार्य मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यापुढील काळातही सामाजिक बांधिलकी जपत रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाच्या पाण्याचे संकलन, डायग्नोस्टिक सेंटर आणि वैद्यकीय शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी दोन्ही संस्थांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.
महेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून उपस्थितांनी पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र वाणी — सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित