पदवीधरांच्या हक्कासाठी सभागृहापासून रस्त्यापर्यंत लढणार; डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा निर्धार

पदवीधरांच्या हक्कासाठी सभागृहापासून रस्त्यापर्यंत लढणार; डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा निर्धार
पदवीधरांच्या हक्कासाठी सभागृहापासून रस्त्यापर्यंत लढणार; डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा निर्धार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ७ :- पदवीधर युवकांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्यातील संधींशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील परमेश्वर रेवगडे यांच्या ‘स्टडी अड्डा अभ्यासिका’मध्ये पदवीधर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

या संवादादरम्यान स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांच्या अडचणी, रोजगाराच्या अपुऱ्या संधी, वाढती बेरोजगारी, अभ्यासासाठी आवश्यक सुविधा, पेपरफुटीच्या घटना, शिक्षण व्यवस्थेतील समस्या तसेच करिअरच्या उपलब्ध संधी यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पदवीधर युवकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि या समस्यांवर प्रभावी व ठोस उपाययोजना कोणत्या असू शकतात, याबाबत युवकांचे म्हणणे जाणून घेण्यात आले.

पदवी मिळवल्यानंतरही रोजगारासाठी संघर्ष करावा लागणाऱ्या हजारो युवकांच्या प्रश्नांकडे केवळ आश्वासने देऊन दुर्लक्ष करता येणार नाही. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा केवळ युवकांचा प्रश्न नसून राज्याच्या भविष्यातील विकासाशी निगडित मुद्दा आहे. त्यामुळे पदवीधरांच्या प्रश्नांना सभागृहापासून रस्त्यापर्यंत ठामपणे वाचा फोडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या संवादावेळी आशिष पवार, अतुल गावंडे, आशिष इंगळे, आनंद मगरे, वैभव ताटे, अरविंद शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदवीधर युवक उपस्थित होते.

“शिक्षणासाठी संघर्ष आणि पदवीधरांच्या हक्कासाठी सातत्याने लढा”, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

अखलाख देशमुख — महाराष्ट्र वाणी न्यूज