नारेगाव मनपा शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

नारेगाव मनपा शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
नारेगाव मनपा शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १६ :- १५ ऑगस्ट २०२६ : नारेगाव येथील मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास नगरसेविका शाहीन पटेल, सन्माननीय नगरसेवक काकासाहेब काकडे, नगरसेविका सादिया अमजत पठाण, नगरसेविका मोहिनी लक्ष्मण गायकवाड तसेच सन्माननीय नगरसेवक गोकुळ मलके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य, केंद्रीय मुख्याध्यापक (मराठी) तिलोत्तमा मापारी मॅडम, मुख्याध्यापक (उर्दू) शेख जुबेर सर, पालक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दिसून आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या प्रगतीमध्ये शिक्षण आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनीही देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

शाळेतील शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘राष्ट्रप्रेम, एकता आणि शिक्षणातून प्रगती’ या भावनेने कार्यक्रमाची सांगता झाली.