धडाकेबाज IAS जी. श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसऱ्यांदा बदली; आता मराठवाड्याचा कारभार त्यांच्या हाती!

धडाकेबाज IAS जी. श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसऱ्यांदा बदली; आता मराठवाड्याचा कारभार त्यांच्या हाती!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १७ :- मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून प्रभावी प्रशासनासाठी ओळखले जाणारे धडाकेबाज अधिकारी जी. श्रीकांत यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अवघ्या 15 दिवसांत दुसऱ्यांदा बदली होत त्यांनी आता मराठवाडा विभागीय आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

2009 च्या UPSC बॅचचे अधिकारी असलेल्या श्रीकांत यांचा जन्म 18 जून 1985 रोजी झाला. ओस्मानिया विद्यापीठातून बी.कॉम शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

लातूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम करताना प्रशासनात वेगळी छाप निर्माण केली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे GST सह आयुक्त तसेच महापालिका आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. विशेषतः महापालिका आयुक्त असताना अतिक्रमणांवर केलेली धडक कारवाई चांगलीच गाजली होती.

गेल्या पाच वर्षांपासून मराठवाड्यात कार्यरत असलेल्या श्रीकांत यांची आता विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण मराठवाड्याचा कारभार त्यांच्या खांद्यावर आला आहे.

छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्त ते मराठवाडा विभागीय आयुक्त – प्रशासनात पुन्हा एकदा ‘धडाकेबाज’ एन्ट्री!

आता त्यांच्या नव्या भूमिकेत मराठवाड्याच्या विकासाला नवा वेग मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.