दिवाळीनिमित्त अग्रवाल समाज हडपसरचा सामाजिक उपक्रम; ५० अनाथ विद्यार्थिनींना शालेय साहित्य व नवीन कपड्यांचे वाटप

पुणे दि २७ :- दिवाळी सणाचे औचित्य साधून अग्रवाल समाज हडपसरच्या वतीने घरटे प्रकल्पातील बंटर शाळेतील ५० अनाथ विद्यार्थिनींना नवीन कपडे, शालेय दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.

सणासुदीच्या काळात गरजू विद्यार्थिनींनाही आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे आणि आपुलकी, प्रेम व सन्मानाची जाणीव व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाचे आयोजन विशाल अग्रवाल, सुरेंद्र गुप्ता, इंद्रजीत अग्रवाल, स्वीटी अग्रवाल आणि शोभा अग्रवाल यांनी केले. तसेच सहयोग फाउंडेशनने विद्यार्थिनींसाठी शालेय साहित्य संच उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

दिवाळीच्या आनंदात गरजू विद्यार्थिनींनाही सहभागी करून घेत शिक्षणाला प्रोत्साहन देणारा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

महाराष्ट्र वाणी — सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित