छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपाचे निर्विवाद वर्चस्व!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २ :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर आता सभापती पदांच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे. मतदारांनी दाखवलेल्या प्रचंड विश्वासामुळे सर्व सभापती पदांवर भाजपा-राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारत राजकीय ताकद दाखवून दिली.
या विजयामागे राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब आणि आमदार अनुराधा चव्हाण यांच्या प्रभावी व कुशल नेतृत्वाची मोठी भूमिका असल्याचे मानले जात आहे.
सभापती पदांसाठी निवड झालेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
👉 सौ. अनिता ज्ञानेश्वर मोठे – आरोग्य व शिक्षण सभापती
👉 सौ. मीनाक्षी किशोर पवार – महिला व बालकल्याण सभापती
👉 श्री. सचिन गरड – (अर्थ व बाधकाम सभापती)
👉 श्री. बालाजी सोनटक्के (राष्ट्रवादी काँग्रेस) – ( समाज कल्याण सभापती)
या निवडीमुळे जिल्हा परिषदेत सत्ताधारी आघाडीची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी काळात विकासकामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
👉 “सत्तेचा किल्ला भक्कम… आता विकासाच्या गतीकडे सर्वांचे लक्ष!”