उलमा बोर्डच्या शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नबी वजीर पटेल यांची नियुक्ती

उलमा बोर्डच्या शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नबी वजीर पटेल यांची नियुक्ती
उलमा बोर्डच्या शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नबी वजीर पटेल यांची नियुक्ती

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १९ :- गुरुवार, १९ मार्च रोजी ऑल इंडिया उलमा बोर्ड मुतवल्ली विंगच्या वतीने सूबेदारी गेस्ट हाऊस येथे दुपारी ३ वाजता आयोजित कार्यक्रमात शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी जनाब नबी वजीर पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र देत त्यांचा सत्कार करण्यात आला.

ऑल इंडिया उलमा बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना नौशाद सिद्दिकी, महासचिव अल्लामा बुनाई हसनी तसेच एज्युकेशन सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष जेबा मलिक यांच्या आदेशानुसार मुतवल्ली विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख फैसल मुजावर यांच्या हस्ते नबी पटेल यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी फैसल मुजावर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत हिंदू समाजाच्या गुढीपाडवा सणाच्या तसेच मुस्लिम बांधवांच्या आगामी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच नबी पटेल यांनी महाराष्ट्रभर शिक्षणाबाबत जनजागृती करून विशेषतः गरीब व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नबी पटेल यांनी दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार मानत, ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे सांगितले. राज्यातील सर्व जिल्ह्यांत दौरे करून विविध समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला उलमा बोर्डच्या औरंगाबाद अध्यक्षा सीमा शकील मांडवीया, शहर उपाध्यक्ष अहमद अली खान, लीगल सेलचे वकील जीशान अली जैदी, नुजहत बाजी, सईदा पठाण, शिवसेना (उद्धव गट)चे ज्योती रविंद्र जगधने, पैठण तालुका अध्यक्ष मुजीब शेख, शमशुद्दीन शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी नबी पटेल यांनी सर्व उपस्थितांचे गुलपोशी करून आभार मानले.

— शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला बळकटी देण्याचा नवा संकल्प!