उच्चशिक्षित इंजिनिअर मित्रासोबत चोर बनला; डायल-112 पोलीसांनी मोटारसायकलसह दोघांना केली अटक!
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दिनांक १६ जून :
एका उच्चशिक्षित संगणक हार्डवेअर इंजिनिअरने आपल्या मित्रासह मिळून स्प्लेंडर मोटारसायकल चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही कारवाई जवाहरनगर पोलिस स्टेशनच्या डायल-112 बिट मार्शल पथकाने तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे.
घटना कशी घडली?
१४ जून २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते ८.१५ च्या सुमारास लत्ता माणिक चुंगडे (वय ४५), रा. कैलासनगर, यांनी आपली स्प्लेंडर मोटारसायकल (MH-20-HA-4769) किड्स प्राईज स्कूल, शास्त्रीनगर येथील मनपा गार्डनसमोर लॉक करून उभी केली होती. मात्र ती तेथून चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १५ जून रोजी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. 216/2025 कलम 303(2) भा.दं.वि.) नोंदविला.
पोलिसांची कसून तपासमोहीम:
या प्रकरणी डायल-112 पथकातील पोलीस कर्मचारी पोह/1129 वामन नागरे, पोअ/मारोती गोरे यांना गुप्त माहिती मिळाली की गजानन मंदिर ते कडा ऑफिस परिसरात एक संशयित इसम चोरीची स्प्लेंडर विक्रीसाठी येणार आहे. यानुसार सापळा रचून आदित्य गणेश राजपूत (वय २५, रा. शास्त्रीनगर, मुळगाव इंदिरानगर, बुलढाणा) या संशयितास ताब्यात घेण्यात आले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने मित्र प्रणव विकास घोडके (रा. विशालनगर, गारखेडा) याच्यासोबत मिळून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
मोटारसायकल हस्तगत आणि न्यायालयात हजर:
प्रणव घोडके यालाही दौलताबादजवळील शेळके ढाब्यावरून अटक करण्यात आली. त्यांनी चोरीची स्प्लेंडर विक्री न झाल्यामुळे परत दिल्याचे सांगितले. १६ जून रोजी न्यायालयात हजर करताच, न्यायालयाने आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौकशीत त्यांनी मोटारसायकल कडा ऑफिस परिसरात लपवून ठेवल्याचे मान्य केले. त्यानुसार पंचनामा करून चोरलेली स्प्लेंडर (चेसिस नं. MBLHAW221R5G03611, अंदाजे किंमत ₹४५,०००/-) पोलिसांनी हस्तगत केली.
प्रशंसनीय पोलिस कारवाई:
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपआयुक्त प्रशांत स्वामी (परिमंडळ-२), सहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत पाटील (उस्मानपुरा विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अनिल भाले, वामन नागरे, मारोती गोरे आणि ज्ञानेश्वर शेलार यांनी केली. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.