अंधारीतील ‘एस मार्ट’ला आमदार अब्दुल सत्तार यांची सदिच्छा भेट; ग्रामीण भागातील आधुनिक व्यवसाय उपक्रमाचे केले कौतुक

महाराष्ट्र वाणी

अंधारी, ता. सिल्लोड दि १० :- सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी अंधारी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील सेट पाटणी यांच्या ‘एस मार्ट’ला सदिच्छा भेट देत विविध विषयांवर संवाद साधला.

ग्रामीण भागातील नागरिकांना शहराप्रमाणे विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने अंधारीसारख्या गावात आधुनिक पद्धतीने ‘एस मार्ट’ची उभारणी करण्यात आली आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम ग्रामीण ग्राहकांसाठी सोयीचा ठरणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी नमूद केले.

यावेळी आमदार सत्तार यांनी सुनील सेट पाटणी यांच्याशी व्यवसायाच्या वाटचालीसह गावाच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ग्रामीण भागात रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण करण्याबरोबरच नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू केलेले उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, अजिज सेट बागवान, सोमनाथ हराळ यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित