"हे काय एमआयडीसी की घरचा वाडा?" — इम्तियाज जलील यांचा स्फोटक आरोप

"हे काय एमआयडीसी की घरचा वाडा?" — इम्तियाज जलील यांचा स्फोटक आरोप
"हे काय एमआयडीसी की घरचा वाडा?" — इम्तियाज जलील यांचा स्फोटक आरोप

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ११ जून :- दिनांक १० जून रोजी एमआयडीसी कार्यालयात थेट धडक मारत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. "कायदा फक्त सामान्य लोकांसाठीच आहे का? मंत्र्यांच्या नातेवाइकांसाठी सारे नियम गुंडाळून ठेवले का?" असा थेट सवाल त्यांनी केला.

त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं – "हे वाटप म्हणजे सरळसरळ सत्ता वापरून लूटमार आहे. हे तात्काळ रद्द करून लिलाव प्रक्रियेनुसार जमीन द्या, अन्यथा आम्ही थेट ईडी, सीबीआय आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावू!"

जलील यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली असून, मंत्र्यांच्या अंगावरही प्रश्नांची धार झेलण्याची वेळ आली आहे. "सत्तेचा गैरवापर आणि घराणेशाही आम्ही खपवून घेणार नाही!" अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली आहे.