समाजाच्या विकासासाठी मुस्लिम प्रतिनिधींचे संख्याबळ वाढणे गरजेचे – हाजी जुबेर मेमन
✍️ महाराष्ट्र वाणी
पुणे (प्रतिनिधी) दि १५ :- येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे. मुस्लिम उमेदवारांचे संख्याबळ वाढल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. समाजाच्या विकासासाठी अधिकाधिक मुस्लिम खासदार व आमदार निवडून यायला हवेत, असे मत महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजातील अनेक उमेदवार विजयी झाले. या सर्व विजयी उमेदवारांचा भव्य सत्कार समारंभ पुण्यातील आझम कॅम्पस येथे महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना हाजी जुबेर मेमन बोलत होते.
हा कार्यक्रम हाजी जुबेर मेमन यांच्या संयोजनाखाली पार पडला.
प्रमुख उपस्थिती
या सत्कार समारंभाला पुढील मान्यवर उपस्थित होते—
कारी इद्रिस अन्सारी
कलाकार आसिफ अलबेला (मालेगाव)
कारी मुद्दसिर
अॅड. सुलतान शहा
कारी जमील
ईलहाजोद्दीन फारुखी (अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना – राष्ट्रीय अध्यक्ष)
कामील शेख (आदिल पब्लिकेशन)
फरीद खान (पुणे शहर अध्यक्ष, महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स)
इकबाल अन्सारी
मजहर शेख
अक्रम मदारी आदी.
याशिवाय पुणे, नाशिक, सोलापूर, लातूर, कोल्हापूर, मिरज, मुंबई, ठाणे, धाराशिव, अहिल्यानगर, रत्नागिरी, संभाजीनगर आदी विविध भागांतील नगरसेवक तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल अन्सारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुणे शहर महिला अध्यक्ष फरहीन सय्यद यांनी मानले.