घरफोडीचा गुन्हा उघडकीस; आरोपी जेरबंद, २.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त!

घरफोडीचा गुन्हा उघडकीस; आरोपी जेरबंद, २.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त!
घरफोडीचा गुन्हा उघडकीस; आरोपी जेरबंद, २.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने तसेच त्यांची विक्री करून खरेदी केलेले साहित्य असा एकूण २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५९/२०२६ अंतर्गत कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दि. २४ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत घडला होता.

गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान दि. १३ जून २०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार दिपक दामोदर बोर्डे (वय ३४), रा. वैतागवाडी, नाथव्हॅली रोड, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीकडून १ लाख ८४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच दागिन्यांची विक्री करून खरेदी केलेले फ्रिज, कुलर, पलंग व अन्य फर्निचरचे साहित्य (३४ हजार रुपये किंमत) जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला सातारा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त श्री प्रविण पवार, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर-घारगे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, पोलीस हवालदार सुनील जाधव, दिपक शिंदे, शिनगारे, वाडीलाल जाधव, तसेच महिला पोलीस अंमलदार गीता शिकारे व पूजा इंगळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वाचत रहा महाराष्ट्र वाणी — आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ!