अंभई ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर; आगामी निवडणुकीचे चित्र स्पष्ट

वॉर्डनिहाय आरक्षण निश्चित; इच्छुक उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग

अंभई ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर; आगामी निवडणुकीचे चित्र स्पष्ट

महाराष्ट्र वाणी 

अंभई, दि. ९ जून : अंभई ग्रामपंचायत कार्यालयात आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. मंडळ अधिकारी श्री. सोनवणे, ग्राममहसूल अधिकारी अभिजित बनसोडे, ग्रामपंचायत अधिकारी बी. एस. मुकाडे तसेच गावातील विविध अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार आगामी ग्रामपंचायत निवडणुकीतील जागांचे आरक्षण निश्चित झाले असून, इच्छुक उमेदवार आणि राजकीय गटांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

प्रभागनिहाय आरक्षण

वॉर्ड क्र. १

अनुसूचित जमाती (महिला)

खुला (पुरुष)

खुला (महिला)

वॉर्ड क्र. २

अनुसूचित जमाती (पुरुष)

इतर मागासवर्गीय (महिला)

खुला (पुरुष)

वॉर्ड क्र. ३

अनुसूचित जमाती (महिला)

इतर मागासवर्गीय (पुरुष)

खुला (महिला)

वॉर्ड क्र. ४

इतर मागासवर्गीय (पुरुष)

खुला (महिला)

खुला (पुरुष)

वॉर्ड क्र. ५

अनुसूचित जाती (महिला)

इतर मागासवर्गीय (महिला)

खुला (पुरुष)

या आरक्षण सोडतीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रारूप स्पष्ट झाले असून, विविध वॉर्डांमधील संभाव्य उमेदवारांची समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

👉 अंभई ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक अपडेटसाठी ‘महाराष्ट्र वाणी’सोबत राहा.