उत्तम शिक्षणासाठी पालकांची पहिली पसंती; मुलाव्यात ‘आलिशान इंग्लिश मीडियम स्कूल’चे प्रवेश सुरू!

उत्तम शिक्षणासाठी पालकांची पहिली पसंती; मुलाव्यात ‘आलिशान इंग्लिश मीडियम स्कूल’चे प्रवेश सुरू!

महाराष्ट्र वाणी 

मुलावा (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) दि १३ :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने आलिशान इंग्लिश मीडियम स्कूल, मुलावा येथे शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी, के.जी. १ आणि के.जी. २ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. “उत्तम शिक्षण... उज्ज्वल भविष्य!” हे ब्रीदवाक्य घेऊन शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे.

इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी व समर्पित शिक्षकवर्ग, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल शिक्षण पद्धती आणि सुरक्षित वातावरण यामुळे शाळेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांवरही विशेष भर दिला जातो.

शाळेत सुसज्ज व हवादार वर्गखोल्या, खेळाचे मैदान, वाहतुकीची सुविधा तसेच आधुनिक शिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्व साधनसामग्री उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी प्रवेशाची संधी गमावू नये, असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.

प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी ७६२०३०४८२३ किंवा ७५५८५८५६९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

"चांगले शिक्षण... चांगले संस्कार... उज्ज्वल भविष्याची हमी!" — आलिशान इंग्लिश मीडियम स्कूल, मुलावा.

👉 अशाच शैक्षणिक, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्र वाणीसोबत जोडलेले रहा!