“फावडा नव्हे, प्रत्येक हातात पुस्तक हवे!” – मिर्ज़ा अबूल हसन अली यांच्या विचारातून बालशिक्षणाचा संकल्प; ‘रीड अँड लीड फाउंडेशन’चा समाजजागृतीचा संदेश

“फावडा नव्हे, प्रत्येक हातात पुस्तक हवे!” – मिर्ज़ा अबूल हसन अली यांच्या विचारातून बालशिक्षणाचा संकल्प; ‘रीड अँड लीड फाउंडेशन’चा समाजजागृतीचा संदेश

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १३ :- “फावड़ा न कुदाल होगी, हर हाथ में किताब होगी” या प्रख्यात शायर मिर्ज़ा अबूल हसन अली यांच्या प्रेरणादायी विचाराला केंद्रस्थानी ठेवत रीड अँड लीड फाउंडेशन, औरंगाबाद यांच्या वतीने बालशिक्षण, बालहक्क आणि बालमजुरी निर्मूलनाचा व्यापक संकल्प करण्यात आला आहे. “कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये” हा संदेश देत संस्थेने समाजातील सर्व घटकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आजही देशातील अनेक मुले आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक कारणांमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहत आहेत. काही ठिकाणी बालमजुरीचे प्रमाण कायम असून, मुलांच्या हातात पुस्तके असण्याऐवजी कामाची साधने दिसून येतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी समाजात जनजागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

या उपक्रमांतर्गत बालमजुरीविरोधी जनजागृती अभियान, पुस्तक वितरण व वाचन संस्कृतीचा प्रसार, शिक्षण व शिष्यवृत्ती सहाय्य, बालकांच्या मानसिक आरोग्याविषयी जागरूकता कार्यक्रम, मोहल्ला ग्रंथालय व सामुदायिक शिक्षण अभियान, तसेच वंचित मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडण्याचे प्रयत्न राबविण्यात येणार आहेत.

“प्रत्येक हातात पुस्तक, प्रत्येक मनात आशा” हा संदेश देत संस्थेने शिक्षणाला केवळ हक्क नव्हे तर समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे अधोरेखित केले. प्रत्येक मुलाला शिक्षण, सुरक्षा, सन्मान आणि उज्ज्वल भविष्य मिळावे, यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रीड अँड लीड फाउंडेशनचे पदाधिकारी म्हणाले की, “मुलांच्या हातात कामाची साधने नव्हे तर ज्ञानाची पुस्तके असावीत. शिक्षण हीच त्यांच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाने या परिवर्तनाच्या प्रवासात आपले योगदान द्यावे.”

रीड अँड लीड फाउंडेशन, औरंगाबाद यांनी नागरिकांना शिक्षण, जागरूकता आणि संवेदनशीलतेच्या माध्यमातून बालमजुरीमुक्त भारताच्या निर्मितीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

📞 संपर्क : 9325203227

Igniting the Mind, Educating the Child

“एका मुलाच्या हातात पुस्तक देणे म्हणजे केवळ त्याचेच नव्हे, तर संपूर्ण समाजाचे भविष्य उजळविणे होय!” 📚✨