‘समतेचा जागर, विचारांना अभिवादन’ – काँग्रेसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

‘समतेचा जागर, विचारांना अभिवादन’ – काँग्रेसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
‘समतेचा जागर, विचारांना अभिवादन’ – काँग्रेसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

✍️ महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १४ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भडकल गेट येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली. तसेच त्यांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या विचारांचा जागर करण्यात आला.

बाबासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत समाजातील अन्याय, अस्पृश्यता आणि भेदभावाविरुद्ध संघर्ष उभारला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा विचार आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा ठरतो. भारतीय संविधानाच्या निर्मितीत त्यांनी बजावलेली भूमिका ऐतिहासिक असून, त्यांच्या कार्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि न्यायाची हमी मिळाली आहे.

कार्यक्रमास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जिल्हा प्रभारी विवेक बन्सल, खा. डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समतेच्या वाटेवर चालण्याचा संदेश देत, बाबासाहेबांचे विचार आजही समाजाला दिशा देत आहेत – हीच खरी त्यांना मानवंदना!